आदिवासी बोलीभाषा कक्ष

मार्गदर्शक : डॅा. भक्ती उमर्जी, प्राचार्य सहाय्यक : श्री. चौधरी दिनेश, ज्येष्ठ अधिव्याख्याता

प्रस्तावना
सन २०१३ मध्ये इ. १ ली व २ री चा पुनर्रचित अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाने लागू केला. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे व त्यातील गुणवत्ता वाढवणे या दृष्टीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्याने प्रभावीपणे प्रतिसाद देउुन राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० विकसित करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २०१३-१४ मध्ये इ. १ ली व २ री चा पुनर्रचित अभ्यासक्रम तयार करुन राबविण्यास सुरुवात केली. या अभ्यासक्रमात भाषेच्या संदर्भात काही महत्वाचे बदल करण्यात आले.
 

सन २००९ मध्ये R.T.E. स्विकारला. या कायदयानुसार शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचे उिद्दष्ट शासनाने गृहित धरले आहे. शिक्षकाला पटसंख्या वाढविणे, तो टिकविणे व विदयार्थी गुणवत्ता वाढविणे हे शिक्षकांसमोर मोठे जिकरीचे काम आहे. यामध्ये आदिवासी बहुलक्षेत्रातील शिक्षकांना बोलीभाषेची अडचण निर्माण होते. त्याचबरोबर विदयार्थ्यांनाही त्यांच्या भाषेत सांगितले तर त्यांनाही शिक्षणाची गोडी    निर्माण होते.

ठाणे व पालघर हे आदिवासी बहुलक्षेत्र असलेले जिल्हे आहेत. या जिल्हयातील विदयार्थी संख्या लक्षात घेता अशा कक्षाची निर्मिती करणे आवश्यक वाटले.

चालू वर्षी खालील प्रकारच्या साहित्याचे विकसन केले.

कातकरी - मराठी भाषा चित्रशब्दकोष

कातकरी - मराठी भाषा चित्रशब्दकोष

मराठी - कातकरी भाषा संवादिनी

मराठी - कातकरी भाषा संवादिनी

मराठी - कातकरी भाषा शब्दकोष

मराठी - कातकरी भाषा शब्दकोष