विज्ञान केंद्र विकसन

मार्गदर्शक : डॅा. भक्ती उमर्जी, प्राचार्य सहाय्यक : श्रीम. मनिषा चौधरी

  • प्रस्तावना
    शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञान मिळण्याची प्रक्रिया ही नेहमी चालूच राहते. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात तर शिक्षण क्षेत्रात अनेक बदल वेगाने होत आहेत. म्हणून या बदलांबाबत आपल्याला माहिती असायला हवी. विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय प्राथमिक व माध्यमिक स्तरावर अनिवार्य आहे आणि आजच्या शिक्षण प्रणालीचा केंद्रबिंदू हा विदयार्थी आहे. म्हणून या विदयार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वाचा विकास करणे हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय आहे. परंतु केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही तर ते ज्ञान विदयार्थ्यांना त्याछयाच शब्दात पोहोचविण्यासाठी प्रात्यक्षिकांची, तार्किकतेची गरज आहे.
    आज विज्ञान व तंत्रज्ञानात अग्रेसर असणारे देशच प्रगत राष्त््र म्हणून ओळखले जातात. म्हणूनच आपल्या देशाला प्रगतीच्या सिखरावर पोहचवायचे असेल तर या भावी पिढीला विज्ञान व तंत्रज्ञानात प्रगती करणे गरजेचे आहे. वैज्ञानिक सिद्धांतातील प्रचिती क्षमतेचे निकष, अचूकता, प्रायोगिकता, उपयोजन हे घटक त्यांच्या अंगी रुजणे आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य ते संदेशवहनाचे माध्यम वापरणे हे सुद्धा महत्वाचे आहे. आज २१ व्या शतकात सुद्धा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा समाजात ठोकावताना दिसत आहेत. परंतू आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक घटनेमागे विज्ञान आहे, हेच सत्य आहे आणि सत्य हेच विज्ञान आहे. हे विदयार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अगस्त्य इंटरनॅशनल फाउुंडेशन’ या ण्घ्ै मार्फत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रहाटोली (ठाणे) येथे विज्ञान केंद्र सप्टें. २०१५ पासून सुरु करण्यात आले आहे. त्या विज्ञाान केंद्रात विदयार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपलब्ध असणारे विविध प्रयोग त्याचबरोबर गणित विषयाशी संबंधीत सूत्रांवर असणारे मॅाडेल यांची मांडणी करण्यात आली आहे. या विज्ञान केंद्रामुळे विदयार्थ्यांना खगोलशास्त्रीय ज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र त्याचबरोबर भौतिकशास्त्र याविषयीची सखोल माहिती/ज्ञान मिळण्यास चांगली संधी उपलब्ध आहे.
  • हेतू
    सदर उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हे विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे हे आहे. दैनंदिन जीवनात घडणार्‍या अनेक छोटया मोठया घटनांमागे विज्ञान व तंत्रज्ञान हे कशा प्रकारे कारणीभूत ठरतात ते सर्व छोटे छोटे खेळ व कृतियुक्त माध्यमातून विदयार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करणे, तसेच प्रत्येक घटनेमागील कारणमीमांसा विदयार्थ्यांना स्वत:ला समजावी, त्याला त्याचे उपयोजन करता यावे यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे अध्ययन-अध्यापन करणे हे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे.
    त्याचबरोबर विदयार्थ्यांमध्ये वैचारिक क्षमता, सृजनशिलता, समन्वय, जिज्ञासूवृत्ती, स्वयंअध्ययन यासारख्या क्षमता विकसित करणे हे या उपक्रमाचे साध्य आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ १३५०-१४०० विदयार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला आहे. येथे शिकताना विदयार्थ्यांना अनेक नवीन प्रयोग प्रत्यक्ष करायला, पाहायला मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. त्याचबरोबर प्रत्येक घटनेकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची सवय अंगी बाणली गेली.