संशोधन विभाग

विभागप्रमुख : श्रीम. त्रिभुवन एस. व्ही., ज्येष्ठ अधिव्याख्याता

 • विभाग स्तरावरील संशोधन
  महाराष्ट्र शासनाने गठित विषयातील संपादणूकीचा विचार करुन इ. ५ वी च्या विदयार्थ्यांकरिता अध्ययन संपादणूक सर्वेक्षण सन २०१३-१४ या वर्षात केले. स्लॅसच्या अहवालात इ. ५ वी च्या विदयार्थ्यांची गणित विषयातील संपादणूक पातळी ज्या जिल्हयामध्ये जास्त आढळून आली त्यामध्ये मुंबई शहर हा जिल्हा ही होता. मुंबई शहरातील मनपा शाळेतील मराठी माध्यमाच्या इ. ५ वी च्या विदयार्थ्यांची सरासरी २१ टक्के होती. मुंबई खाजगी शाळांतील विदयार्थ्यांची सरासरी २३.८९ टक्के एवढी होती. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत मुंबई शहरातील मनपा क्षेत्रातील शाळांमधील आणि खाजगी अनुदानित व्यवस्थापनाच्या शाळामधील इ. ५ वी च्या गणित विषयातील संख्याज्ञान, अपूर्णांक संख्यावरील क्रिया इ. क्षेत्रावरील संपादणूक वृद्धीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रहाटोली, जि. ठाणे या संस्थेने विभागस्तरीय संशोधन कार्य पूर्ण केले.
  समस्या विधान : मुंबई शहरातील इ. ५ वी च्या विदयार्थ्यांची गणित विषयातील संपादणूक वृद्धीसाठी कृतिकार्यक्रमाचे विकसन
  उद्दिष्टे :
  १)    इ. ५ वी च्या विदयार्थ्यांच्या गणित विषय संपादणूक वृद्धीसाठी कृतिकार्यक्रमाचे विकसन करणे.
  २)    इ. ५ वी च्या विदयार्थ्यांच्या गणित विषय संपादणूक वृद्धीसाठी अध्ययन साहित्याच्या साहाय्याने कृतिकार्यक्रमाची             अंमलबजावणी करणे.
  ३)    कृतिकार्यक्रमाची परिणामकारकता अभ्यासणे.
  संशोधनाची कार्यवाही : निवडलेल्या न्यादर्श विदयार्थ्यांकरिता प्रायोगिक पद्धती वापरली. संबंधित शाळामध्ये कृतिकार्यक्रमाची अंमलबजावणी करुन अंतिम चाचणी व पूर्व चाचणीत असलेल्या गुणांकरिता टी-टेस्ट चा वापर करुन निष्कर्ष काढण्यात आले.
  प्रस्तुत संशोधनात मनपा शाळा आणि अनुदानित शाळा यांचा अभ्यास केला असता संशोधनाअंती अनुदानित शाळेतील विदयार्थ्यांच्या गुणांच्या सरासरीवर उपचारात्मक पद्धतीचा मनपा शाळेतील विदयार्थ्यांच्या गुणांच्या सरासरीच्या तुलनेत अधिक परिणाम दिसतो. उपचारात्मक पद्धतीमुळे विदयार्थ्यांचे सरासरी गुण वाढण्याचे प्रमाण अनुदानित शाळेत ७०õ तर मनपा शाळेत ४२õ व सर्व शाळांचा विचार करता ५६õ आढळले.
 • डायट स्तरावरील संशोधन
  समस्या विधान : मराठी भाषा माध्यमांच्या शाळांतील इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या विदयार्थ्यांच्या मराठी भाषा विषयाच्या शब्दसंपदा वृद्धीसाठी भाषा समृद्धी कार्यक्रमाचे विकसन व त्याचा मराठी भाषा शब्दसंपादनावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास.
  संशोधिका :  डॅा. भक्ती उमर्जी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे-पालघर
  उद्दिष्टे :
  १)    इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विदयार्थ्यांच्या शब्दसंपदा वृद्धीसाठी भाषासमृद्धी कार्यक्रमाचे विकसन करणे.
  २)    इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विदयार्थ्यांच्या शब्दसंपदा वृद्धीसाठी भाषासमृद्धी कार्यक्रमाची अंमलबजवणी करणे.
  ३)    इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विदयार्थ्यांच्या शब्दसंपदा वृद्धीसाठी भाषासमृद्धी कार्यक्रमाचा विदयार्थ्यांच्या शब्दसंपादनावर होणारा परिणाम अभ्यासणे.
  मराठी भाषा विषयाची सदय:स्थिती
  महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. परंतु तिथे शिकविल्या जाणार्‍या मराठी भाषेच्या दर्जाबद्दल किती जण सजग आहेत? मराठी काय आपलीच भाषा ती कोणीही शिकवील आणि त्यात कोणीही पास होईल या विचाराने मराठीकडे ज्या काळजीने बघायला हवे तितके बघितले जात नाही. शिक्षणाने सार्वत्रिकीकरण झाल्याने वेगवेगळया परिसरातून विदयार्थी शाळेत येतात. त्या परिसराचा प्रभाव त्यांच्या भाषेवर झालेला असतो. अनेक ठिकाणी मराठीच्याच बोलीभाषा बोलल्या जातात. तेही संस्कार घेउुन विदयार्थी येतो. अशा वेळी मराठीच्या शिक्षकाने या विदयार्थ्यांच्या बोलण्यातील दोष, अशुद्धता प्रयत्नपूर्वक दूर केले पाहिजेत. पण दुर्दैैवाची गोष्ट म्हणजे आपले विदयार्थी ‘न’ च्या जागी ‘ण’ म्हणतात. ‘आहे’ च्या जागी ‘हाये’ म्हणतो, इकडे मराठीच्या शिक्षकांचेही विशेष लक्ष जात नाही. एक धाडसी विधान करायचे झाले तर काही मराठी शिक्षकांच्याच या चुका होतात. अशा अनेक कारणांमुळे लेखनातील दोष, उच्चारणातील दोष तसेच राहतात. पर्यायाने विदयार्थ्यांची बोलली जाणारी भाषा, लिहिली जाणारी भाषा प्रमाणित नसते.  संशोधनाची कार्यवाही :

  •  संबंधित साहित्याचा आढावा घेणे.
  • संशोधन आराखडा तयार करणे
  • भाषासमृद्धी कार्यक्रम तयार करणे.
  • भाषासमृद्धी कार्यक्रम तज्ञांकडुन तपासून अंतिम स्वरुप देणे.
  • यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड करणे.
  • शाळांमध्ये जाउुन कृतिकार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • माहिती संकलन व विश्लेषण करणे.
  • अहवाल लेखन

  निष्कर्ष :

  • प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात निर्धारित केलेल्या इयत्तानिहाय शब्दसंपदा प्रभुत्व दरापेक्षा ठाणे जिल्हयातील इ. ३ री ते ५ वी च्या विदयार्थ्यांचे शब्दसंपदेवरील प्रभुत्व निम्न स्तरावरील आहे.
  • कृतिकार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे इ. ३ री ते ५ वी च्या विदयार्थ्यांच्या शब्दसंपदेमध्ये वाढ झालेली आहे.
  • एकंदरीत विदयार्थ्यांच्या शब्दसंपदेत प्रस्तुत संशोधनातील उपक्रमामुळे वाढ झालेली दिसते.
 • शिक्षकांनी सन २०१४-१५ पर्यंत केलेली संशोधने
  प्रस्तावना-
  जिल्हयातील शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन व्यावसायिक जीवनात अध्ययन-अध्यापन विषयक अनेक समस्या निर्माण होतात. जिल्हयातील अनुभवी होतकरु शिक्षकांना प्रेरणा व मार्गदर्शन देवून त्यांच्याकरवी कृतिसंशोधनाद्वारे काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी केलेली कृतिसंशोधने इतर शिक्षकांना        मार्गदर्शक व प्रेरणादायी व्हावी म्हणून संस्थेत नव्याने संशोधन कक्षाची उभारणी केली. चालू वर्षी यासाठी खालील शिक्षकांनी योगदान दिले.

संशोधन विषय

अ.क्र. संशोधनाचे विषय संशोधकाचे नाव शाळेचे नाव
 इ. ६ वी च्या विदयार्थ्यांमध्ये निबंधलेखन क्षमता विकसित करण्यासाठी योजलेल्या उपक्रमांची परिणामकारकता अभ्यासणे. श्री. रमेश शंकर सुरोशी उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २४
इ. ४ थी च्या विदयार्थ्यांना गणित विषयात येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्री. गजानन जनार्दन बर्‍हाटे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. १४
इ. ६ वी च्या विदयार्थ्यांना इंग्रजी भाषेतील वाक्यरचना करण्यात येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्री. दिलीप भास्कर झोपे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २०
 इ. ६ वी क च्या विदयार्थ्यांना गणितातील मसावि काढताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. माधवी माधव जाधव उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २४
इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांच्या निबंधलेखन क्षमतेचा विकसित करण्यासाठी योजलेल्या उपक्रमांच्या परिणामकारकता अभ्यासणे. सौ. जयश्री जयवंत दवणे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २
इयत्ता ५ वी क च्या विदयार्थ्यांना इंग्रजी शब्दसंपत्तीचे आकलन होण्यात येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. सौ. ज्योत्स्ना जगन्नाथ कोर उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २४
इ. ४ थी च्या विदयार्थ्यांना जाोडाक्षरे लेखन करताना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. सौ. सुनिता विलास पाटील उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २४
इयत्ता ६ वी च्या विदयार्थ्यांच्या भाषा विषयातील आकारिक मूल्यमापनाच्या नोंदी करतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. श्री. राजेश रामचंद्र मदने नालंदा प्राथमिक विद्यालय उल्हासनगर-४
इयत्ता २ री च्या विदयार्थ्यांच्या जोडाक्षरे लेखनात होणार्‍या चुकांचा शोध व उपाय. सौ. राजश्री वासुदेव चौधरी उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २९
१० इ. पाचवी च्या विदयार्थ्यांना इंग्रजी अनुलेखन करताना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. सौ. हर्षदा हरीश नलावडे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. १७
११ इयत्ता ६ वी अ च्या विदयार्थ्यांना प्रमाणभाषेत बोलताना व लिहितांना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्रीम. सुमित्रा बळीराम जाधव उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. १७
१२ इ. ७ वी च्या विदयार्थ्यांच्या नकाशावाचनातील चुकांची कारणांचा शोध व उपाय. श्री. सुनिल शिवदास मराठे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २४
१३ इ. ७ वी/क च्या विदयार्थ्यांना चित्रकला विषयात येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्री. सतीश रामदास बाविस्कर उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. १७
१४ इ. ४ थी ड च्या विदयार्थ्यांना गणितातील भागाकार करतांना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. सौ. महानंदा विक्रम बोडखे शांतीग्राम विदयामंदिर उल्हासनगर ३
१५ इ. ७ वी अ च्या विदयार्थ्यांना संगणक हाताळताना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. सौ. संगिता अनिल इंगळे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. १७
१६ इ. ३ री च्या विदयार्थ्यांना भाषा विषयातील आकारिक मूल्यमापना च्या नोंदी करतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. श्री. संजय दगडू शिंदे शांतीग्राम विदयामंदिर उल्हासनगर ३
१७ इ. ५ वी च्या विदयार्थ्यांना गणित विषयातील चौकोन, त्रिकोण, आयत व त्रिकोणाची परिमिती काढताना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्रीम. विद्या दिलीप झोपे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २३
१८ इ. ४ थी तील विदयार्थ्यांचे ‘काल्पनिक निबंध लेखन’ करतांना होणार्‍या चुकांचा शोध व उपाय. सौ. संजीवनी गोपाळ भगत शांतीग्राम विदयामंदिर उल्हासनगर ३
१९ इयत्ता ७ वी क च्या विदयार्थ्यांना चिन्हांकित संख्यांचा वापर करतांना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्री. पांडूरंग चाळू देसाई महाराष्ट्र मित्र मंडळ संचलित प्राथमिक शाळा,उल्हासनगर-१
२० इयत्ता ५ वी ई च्या विदयार्थ्यांना इंग्रजी लेखनात होणार्‍या चुकांचा शोध व उपाय. श्री. काशिनाथ वाळकू मोरे महाराष्ट्र मित्र मंडळ संचलित प्राथमिक शाळा,उल्हासनगर-१
२१ इयत्ता ५ वी च्या विदयार्थ्यांना मराठी वाचनात येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. श्रीम. रुपाली रघुनाथ बने उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. १४
२२ इयत्ता ४ थी च्या विदयार्थ्यांना गणित विषयातील भागाकार करताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. अपर्णा चारुदत्त राणे उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २९
२३ इयत्ता ४ थी च्या विदयार्थ्यांना मराठी वाचन कौशल्य आत्मसात करण्यात येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. श्रीम. गीता रामचंद्र जाटोलिया उल्हासनगर म. न. पा. गुजराथी शाळा क्र. १३
२४ इयत्ता ४ थी ‘क’ मधील विदयार्थ्यां ना भागाकारातील येणार्‍या समस्यांचा व उपाय. सौ. निर्मला मंगेश धांडे सेंच्युरी रेयॅान प्राथमिक शाळा शहाड
२५ इयत्ता तिसरीच्या विदयार्थ्यांना मराठी भाषेत वाचन करताना येणार्‍या  समस्यांचा शोध व उपाय. सौ. आशा जनार्दन दुबे सेंच्युरी रेयॅान प्राथमिक शाळा शहाड
२६ इयत्ता तिसरीच्या विदयार्थ्यांना मराठी भाषेत वाचन करताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ.सुमिता अनिल दत्ता सेंच्युरी रेयॅान प्राथमिक शाळा शहाड
२७ इ. ५ वी च्या विदयार्थ्यांना येणार्‍या भौमितिक रचनांच्या समस्यांचा शोध व उपाय. श्री. उल्हास प्रल्हाद इंगळे छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा उल्हासनगर
२८ इ. ३ री च्या विदयार्थ्यांना वाचन करताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. मिनाक्षी जिवलाल खलाणे राजमाता जिजाउु विद्यामंदिर (मांजर्ली) बदलापूर
२९ इ. ४ थी च्या विदयार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशावाचन करतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. निर्मला दिलीप साळुंखे महिला मंडळ संचलित प्राथमिक शाळा, शहापूर
३० इयत्ता ५ वी च्या विदयार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा विषयात स्पेलिंग लेखनात येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. किरण सोमाकांत कोलते उल्हासनगर म. न. पा. मराठी शाळा क्र. २९
३१ इयत्ता ३ री च्या विदयार्थ्यांना ३ अंकी संख्येचे वाचन व लेखनात आढळणार्‍या उणीवांचा शोध व उपाय. सौ. संजिवनी अशोक गायकवाड जि. प. शाळा चामटोली, अंबरनाथ
३२ इ. ४ थी च्या विदयार्थ्यांना गणित विषयात अपूर्णांकाचा लहान- मोठेपणा ठरविताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. श्री. नवनाथ ज्योतीराम अस्वरे जि. प. प्राथमिक शाळा शिंदीपाडा
३३ परभाषिक विदयार्थ्यांना मराठी माध्यमातून शिकताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. कल्पना प्रभाकर माळी राजमाता जिजाउु विद्यामंदिर मांजर्ली
३४ इयत्ता ३ री तील विदयार्थ्यांना भागाकाराची उदाहरणे सोडविण्यात येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्री. मधुकर झिपा निपुर्ते जि. प. शाळा चिंचपाडा, ता. अंबरनाथ
३५ इयत्ता ४ च्या वर्गातील विदयार्थ्यांच्या मराठी विषयात निबंधलेखनात येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. श्री. विजय शिवाजी चव्हाण जि. प. शाळा नंबरवाडी
३६ इ. २ री च्या विदयार्थ्यांना वजाबाकीची गणिते सोडवतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. प्रिया पुंडलिक भोईर कुळगाव बदलापूर नगरपालिका शाळा बेलवली
३७ इयत्ता ४ थी च्या विदयार्थ्यांना प्रमाणभाषेत बोलताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. सुगंधा नरेंद्र लोकेगांवकर जि. प. शाळा आडिवली
३८ इयत्ता ५ वी तील विदयार्थ्यांना मराठी विषयातील विरामचिन्हयुक्त लेखनात होणार्‍या चुकांचा शोध व उपाय. सौ. स्मिता विवेक मुळे कै. द्वा. ग. नाईक विद्यालय
३९ इ. ३ री च्या विदयार्थ्यांना वाचन करताना येणार्‍या समस्यांचा शोध सौ. छाया प्रमोद पाटील जि. प. शाळा फॅारेस्ट नाका
४० इ. ४ थी च्या विदयार्थ्यांना शाब्दिक उदाहरणे सोडविताना गणिती भाषेत मांडणी करताना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्री. संजय केशव तांबे जि. प. शाळा शिळ
४१ इ. ३ री तील विदयार्थ्यांना इंग्रजी विषयाचे वाचन करताना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. सौ. अनघा आनंद सोनकांबळे जि. प. शाळा ढोके दापिवली, ता. अंबरनाथ
४२ इयत्ता ४ थी च्या विदयार्थ्यांना श्रुतलेखन करताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. स्नेहलता अशोक जाधव जि. प. शाळा कासगांव
४३ इ. ५ वी च्या विदयार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रकटवाचनात येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. मोहिनी अभय मंचरकर जि. प. शाळा आंबेशिव खुर्द
४४ इ. ५ वी च्या विदयार्थ्यांना भौमितिक आकृत्या काढतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. मोहिनी महेश देशमुख कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळा कुळगाव क्र. १
४५ इयत्ता ३ री च्या विदयार्थ्यांना अनुलेखन करताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. प्रतिभा अशोक मडावी जि. प. शाळा वांगणी क्र. २
४६ इ. ३ री च्या विदयार्थ्यांना हातच्याची बेरीज करतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. ऋता प्रशांत जगे कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळा कुळगाव क्र. १
४७ इयत्ता ६ वी च्या विदयार्थ्यांना निबंधलेखन करताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. मंगला चंद्रकांत तावडे जि. प. शाळा सावरे
४८ इयत्ता ४ च्या वर्गातील विदयार्थ्यांच्या मराठी विषयात वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. श्री. विजय उखर्डू जोगी जि. प. शाळा दात्रीचीवाडी
४९ इयत्ता २ री च्या विदयार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सहशालेय कार्यक्रमाचे आयोजन करुन पाहणे. सौ. मृणाल मुकूंद खिस्नी कुळगाव बदलापूर नगरपालिका शाळा क्रमांक ७ कात्रप
५० इयत्ता ४ थी च्या विदयार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे व त्याचा होणारा शारीरिक व मानसिक परिणाम यांचा शोध व उपाय. सौ. वैशाली उदय रसाळ जि. प. शाळा द्वारली
५१ इ. ५ वी च्या विदयार्थ्यांना मराठी विषयातील जोडअक्षरे लिहतांना येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. श्री. नेमाडे सुपडू तुकाराम नालंदा प्राथमिक विद्यालय, उल्हासनगर ४
५२ इ. ६ वी च्या विदयार्थ्यांना भौमितिक रचना करताना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. अस्मिता अविनाश दोंदे उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्र. १९
५३ इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांना भूगोल विषयातील सागरतळरचना व निक्षेप या घटकाचे अध्ययन करतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. वृषाली वसंत बोराडे कु. ब. न. पा. शाळा क्र. १६, बेलवली
५४ इ. ३ री तील विदयार्थ्यांना मराठी विषयातील आशय आकलन होण्यात येणार्‍या अडचणींचा शोध व उपाय. सौ. रचना रामदास घोंगडे जि. प. शाळा जांभिवलीपाडा
५५ इ. ६ वी तील विदयार्थ्यांना हिंदी विषयातील वाचनात होणार्‍या चुकांचा शोध व उपाय. श्रीम. रेखा अनिल पौनिकर कै. द्वा. ग. नाईक विद्यालय, कुळगाव-बदलापूर
५६ इ. ५ वी च्या विदयार्थ्यांना नकाशावाचन करतांना येणार्‍या समस्यांचा शोध व उपाय. सौ. विजया रमेश सनंसे कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळा क्र. १
डाएट विज्ञान कक्षात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाएट परिवार

डाएट विज्ञान कक्षात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाएट परिवार

विज्ञान प्रदर्शानात सहभागी विद्यार्थी प्रयोग करताना

विज्ञान प्रदर्शानात सहभागी विद्यार्थी प्रयोग करताना