ठाणे जिल्हा

भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

ठाण्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे येथे सुरु झाली. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. ६ महानगरपालिका, २ नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी नियोजन प्राधिकरणे असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्हयात १८ आमदार आणि ३ खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. केंद्र शासन अंगीकृत दारु गोळा व शस्त्र निर्मिती करणारा कारखाना अंबरनाथ या तालुक्यात आहे. ठाणे जिल्हयातील भिवंडी हे शहर हातमाग यंत्रावर कपडे विणण्यासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्हयात १० औद्योगिक वसाहती विकसित केल्या आहेत. तीन राष्ट्रीय महामार्ग व तीन लोहमार्ग ठाणे जिल्हयातून जातात. तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली इ. ऐतिहासिक किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.

 • चतुःसीमा
  • पश्चिम- अरबी समुद्र
  • उत्तर- गुजरात, वलसाड जिल्हा
  • पूर्व- अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा
  • दक्षिण- रायगड जिल्हा, मुंबई जिल्हा
 • तालुके
  • ठाणे शहर (महापालिका क्षेत्र )
  • कल्याण
  • मुरबाड
  • भिवंडी
  • शहापूर्
  • उल्हासनगर
  • अंबरनाथ