शाळा श्रेणीसुधार उपक्रम

माहे जून २०१५ मध्ये BRC व CRC च्या मदतीने ठाणे व पालघर जिल्हयांतील शाळांचे पायाभूत चाचणीच्या आधारे श्रेणीनिहाय सर्वेक्षण केले.

शाळांच्या मागासलेपणाची कारणे शोधली व त्यावरील उपायांसाठी BRC va CRC ना मार्गदर्शन केले.

प्रत्येक गट व शहरी साधनव्यक्तींना आपापल्या कार्यक्षेत्रातील ०५ शाळा श्रेणीसुधार उपक्रमांसाठी निवडण्यास सांगितल्या व शाळा भेटी देवून मार्गदर्शन करण्यास सांगितले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर प्रचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांनीही प्रत्येकी २० शाळा दत्तक घेतल्या.

वस्तुत: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावरील विविध कामे पार पाडण्याकामी ज्येष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांचे योगदान घ्यावे लागल्याने त्यांना प्रस्तुत कामी फारसा वेळ मिळाला नाही. परंतू तरीही वर्षाअखेरीस अनेक शाळांच्या श्रेणीमध्ये सुधारणा झाल्याचे आढळले.