प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र २२ जून ची अंमलबजावणी

२२ जून २०१४ रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित झाले त्याची अंमलबजावणी करणे संस्थेचे आदय कर्तव्य होते. याचे कारण सदरचा शासन निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधीत होता. यास्तव या शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी खालील प्रकारे कार्ययोजना पार पाडणे.

 • सर्वात प्रथम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांची बैठक बोलावून शासन निर्णयाचे वाचन व चर्चा.
 • प्रस्तुत शासन निर्णयाचे समज वाढवून यासाठी जिल्हा स्तरावर गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, काही निवडक मुख्याध्यापक यांची बैठक बोलावून त्याचे वाचन व त्यावर चर्चा घडवून आणणे.
 • ठाणे व पालघर जिल्हयातील सर्व साधन व्यक्तींच्या बैठका बोलावून शासन निर्णयाचे वाचन, चर्चा व कार्यात्मक योजना तयार केली.
 • सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर गुणवत्ता कक्षांची स्थापना केली.
 • ठाणे व पालघर जिल्हयातील सर्व तालुका स्तरावर व मनपा स्तरावर गटशिक्षणाधिकारी/मनपा प्रशासन अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व गुणवत्ता कक्षाचे सदस्य यांच्या बैठकांचे आयोजन करुन प्रत्येक विदयार्थी निहाय व प्रत्येक क्षमतानिहाय शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचे नियोजन व त्यासाठी शिक्षकास मदतकार्य यंत्रणेची रचना केली. या कार्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व गटशिक्षणाधिकारी यांची कार्य आढाव मासिक प्रपत्रे विकसित करुन त्यानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावरुन आवश्यक तेथे मार्गदर्शन देण्याची व्यवस्था केली.
 • उपरोक्त बैठकांद्वारे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांना प्रगत शाळांचे उद्दिष्ट ठरवून दिले. तसेच दोन्ही जिल्हयातील केंद्रप्रमुख व शिक्षकांना ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापनासाठी प्रवृत्त केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावरुन यासाठी प्रत्येक साधन केंद्रास ज्ञानरचनावादी अध्यापन प्रात्यक्षिकाच्या सी.डी. उपलब्ध करुन दिल्या. तसेच शिक्षकांचे ज्ञानरचनावादी अध्यापन कौशल्य सुधारावे म्हणून ज्ञानरचनावादी पाठनिरीक्षण साधनाचे विकसन केले.
 • दि. ९ मार्च व ११ मार्च, २०१६ रोजी उपरोक्त कार्यप्रणालीच्या फलनिष्पत्तीच्या अनुषंगाने ठाणे व पालघर जिल्हयातील आढावा बैठका घेतल्या असता असे लक्षात आले की, अजूनही शाळा प्रगत होण्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही.
 • यास्तव निवडक साधनव्यक्ती व संस्थेतील दोन ज्येष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांच्यासाठी कुमठेपीठ येथील अध्यापन तंत्र कौशल्यांचे माहिती करुन घेण्यासाठी २ दिवसीय कार्यशाळेचे आयेजन केले.
 • उपरोक्त प्रशिक्षणावर आधारित सदर १० निवडक साधनव्यक्तींची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मध्ये दि. १४ व १५ मार्च रोजी लगेचच कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत स्वत: प्राचार्यांनी साधनव्यक्तींना त्यांच्या पुढील कार्याची दिशा देण्याबरोबरच प्रत्यक्ष कार्यातील सूक्ष्म बारकावे समजावून दिले.
 • सदर १० निवडक साधनव्यक्तींचे कार्य जास्तीत जास्त वस्तूनिष्ठ होण्याच्या दृष्टीने तसेच ठाणे जिल्हयातील इतर ३० साधनव्यक्तींनाही या कार्यात सहभागी करुन घेण्यासाठी ग्राममंगल पालघर या बहूचर्चीत नाविन्यपूर्ण प्रगत शाळेच्या अभ्यासदौर्‍यांची विदयार्थ्यांना प्रगत करण्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेची समज वाढावी ही अपेक्षा होती.
 • उपरोक्त अभ्यास दौरा व आधी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर पुनश्च दि. १८ ते २२ मार्च या कालावधीत प्रशिक्षण घटकसंच व शैक्षणिक साहित्य निर्मितीचे आयोजन केले. त्यामुळे निवडक साधनव्यक्तीबरोबरच इतर साधनव्यक्तींचीही प्रस्तुत कार्ययोजनेविषयीची समज वाढण्यास मदत झाली.
 • उपरोक्त कार्यावर आधारित सर्व साधनव्यक्तींना प्रथम त्यांच्या नेमून दिलेल्या दत्तक शाळेतील शिक्षकांना म्हणजेच १६० साधनव्यक्ती × ५ दत्तक शाळा × सरासरी ३-४ शिक्षक या हिशोबाने अंदाजे २४००-३२०० शिक्षकांनी पहिल्या टप्प्यात विदयार्थी प्रगत करण्याच्या उपाययोजना व त्यातील अडथळयांच्या निराकरणार्थ मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्याचे ठरले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संदर्भात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. भक्ती उमजी

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संदर्भात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. भक्ती उमजी

शिक्षणाधिकारी ठाणे, मनपा आयुक्त यांच्याशी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संदर्भात चर्चा करताना ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ.

शिक्षणाधिकारी ठाणे, मनपा आयुक्त यांच्याशी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संदर्भात चर्चा करताना ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ.

शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ.

शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ.

शैक्षणिक संस्था सबलीकरण कार्यशाळेस प्राचार्य डॉ. भक्ती उमजी

शैक्षणिक संस्था सबलीकरण कार्यशाळेस प्राचार्य डॉ. भक्ती उमजी