गुणवत्ता सुधार विविध नवोपक्रम

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे मध्ये वर्षभरात निवडश्रेणीची दोन प्रशिक्षणे आयोजित केलेले होती त्यात ८६ शिक्षक सहभागी होते.
प्राचार्यांनी स्वत: प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास मार्गदर्शन केलेले होते. शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी खालील नवोपक्रमासाठी शिक्षकांना उदयुक्त केले होते.

  • शिक्षकाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या कृतींचा अंतर्भाव करुन त्यांची सवय जडवण्यासाठी ‘शिक्षक व्यक्तिमत्व विकासउपक्रम’.
  • शाळेतील शिक्षकांना वाचनाची गोडी लागावी व त्यांचा समजपूर्वक वाचनाचा वेग वाढावा यासाठी ‘वाचनवेग उपक्रम’.
  • शिक्षकाच्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला चालना देण्यासाठी कल्पक ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती’.
  • शिक्षकामध्ये स्वत:त, शाळेत व सहाध्यायात पर्यावरण जागृती होण्यासाठी ‘पर्यावरण जागृती कोपरा विकसन’.
  • शिक्षकाची पालक व समाज संपर्क क्षमता वृिद्धंगत व्हावी व त्यायोगे शाळेच्या भौतिक संसाधनात भर पडावी म्हणून CSR च्या माध्यमातून किमान एक सुविधा शाळेसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे.
  • वरील उपक्रमास प्रत्यक्षात सर्व शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यांच्या कार्याचे पुरावे दप्तरी आहेत.