DIET तपशील

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ च्या नुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची निर्मिती करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९९६ रोजी झाली.

आज रोजी ही संस्था ठाणे व नव्याने अस्तित्वात झालेल्या पालघर जिल्ह्यासाठी काम करते. तसेच मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांनाही मार्गदर्शन करते.
सध्या संस्थेचे कार्यालय १६ एकर शासकीय जागेमध्ये स्थित आहे.

२) प्र्रशासकीय इमारत :
सध्या संस्थेचे कार्यालय १६ एकर शासकीय जागेमध्ये स्थित आहे.

३) उपलब्ध मनुष्यबळ :

  • डायट आस्थापनेवरील कार्यरत पदे :
  • शासकीय अध्यापक विद्यालय, जव्हार आस्थापनेवरील कार्यरत पदे :
  • गट /शहर साधन केंद्र्र ,जि. ठाणे आस्थापनेवरील कार्यरत पदे ( कंत्राटी पध्दतीने) :

४) बाबींची माहिती अनुदान बद्दल तपशील:

५) वार्षिक नियोजन व दिनदर्शिका

६) उपक्र्रम :
शाळा श्रेणी सुधार कार्यक्रम – प्रत्येक B.R.C. व C.R.C तून प्रति साधनव्यक्ती ०५ शाळा याप्रमाणे ठाणे व पालघर जिल्हयातील १२० गटसाधन व्यक्तींनी ६०० शाळांची श्रेणीसुधार कार्यक्रमांसाठी निवड केली. शाळांची पूर्वस्थितीचे स्वयंमूल्यमापन मुख्याध्यापकांकडून करुन घेउुन सहविचाराने शाळेच्या श्रेणीत सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार सर्वच्या सर्व शाळांच्या श्रेणीत सुधारणा झाल्याचे आढळले.
याशिवाय गट व शहरी साधनव्यक्तींनी पार पाडलेली कामे पुढीलप्रमाणे
१) मीना राजू मंच उद्बोधन वर्ग २) S.M.D.C. प्रशिक्षण
३) विज्ञान व अपूर्व मेळावा ४) ABL संदर्भात शाळांना साहित्य वाटप
५) इ. ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रम (A-VIEW) शिक्षक प्रशिक्षण

भाषासमृद्धी कार्यक्रम – या कार्यक्रमांतर्गत इ. ३ री ते ५ वी पर्यंतच्या विदयार्थ्यांच्या मराठी भाषा शब्दसंपदेत वृद्धी होण्यासाठी डायटने विकसित केलेल्या कृतिकार्यक्रमाची पालघर जिल्हयातील ९०õ व ठाणे जिल्हयातील ६०õ शाळांत अंमलबजावणी केली. परिणामी विदयार्थ्यांच्या शब्दसंपदेत वृद्धी झाल्याचे आढळले.

समावेशित शिक्षण तज्ज्ञांनी अंध, अपंग व बहुविकलांग विदयार्थ्यांसाठी नियमित शिक्षकांना उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला.
शाळा भेटी देवून Udise मधील अपंग विदयार्थी संख्या निश्चित केली व त्यांना अध्ययन मार्गदर्शन केले.