सेवापूर्व व सेवांतर्गत विभाग

 • सेवापूर्व विभाग
  - विभागप्रमुख : श्री. आर.एल. जावळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता वर्ग १
  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे अंतर्गत सेवापूर्व शिक्षक प्रशिक्षण विभाग कार्यरत असून या विभागाद्वारे डी. एल. एड. छात्राध्यापकांना सेवापूर्व प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात छात्राध्यापकांना गरजाभिमुख शिक्षण देणे छात्राध्यापकांच्या व्यक्तीमत्व विकास होण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपक्रमाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. सेवापूर्व विभागात वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात, ते पुढीलप्रमाणे -
 • सूक्ष्म अध्यापन
  नवोदित शिक्षकास प्रत्यक्ष वर्गअध्यापनाअगोदर अध्यापनाची सवय होण्यासाठी वेगवेगळया कौशल्यांमध्ये विभागणी करुन त्या विषयाची तयारी छात्राध्यापकाकडून करुन घेण्यात आली. अध्यापनाशी संबंधित कौशल्याच्या सरावामुळे छात्राध्यापकांना प्रत्यक्ष वर्गावर सरावपाठ घेण्याची मदत झाली.
 • सरावपाठ
  छात्राध्यापकांना प्रत्यक्ष वर्गअध्यापनाचा सराव व्हावा या उद्देशाने विषय निहाय सराव पाठाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक छात्राध्यापकाला सर्व शालेय विषयाच्या अध्यापनाची सवय व्हावी म्हणून सरावपाठाचे नियोजन करण्यात आले होते. सरावपाठामुळे छात्राध्यापकामध्ये आत्मविश्वास वाढून प्रत्यक्ष वर्ग अध्यापन करण्यास प्रोत्साहन मिळाले.
 • छात्रसेवाकाल
  छात्राध्यापकाला संपूर्ण शालेय प्रशासनाची अनुभूती मिळण्यासाठी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक यांच्या भूमिका प्रत्यक्ष पार पाडण्यासाठी छात्रसेवाकालाचे आयोजन करण्यात आले.
 • समाजसेवा शिबीर
  शाळा व समाज हे परस्परपुरक घटक असल्याने छात्राध्यापकांना सामाजिक बाबींची माहिती व्हावी, त्यांच्यात श्रामप्रतिष्ठा, स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रप्रेम इत्यादी मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी छात्राध्यापकाकरिता समाजसेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले.
 • प्रवेश प्रक्रिया
  जिल्हयात डी.एल.एड. अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया स्पॉट अॅडमिशन प्रणालीने सर्व अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांचे प्रवेश घेण्यास मदत केली. जिल्हयातील डी.एल.एड. विद्यालयात अभ्यासक्रम योग्यरित्या शिकवला जाण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन भेटीअंती केले.
 • विविध उपक्रमांचे आयोजन
  १) जयंत्या
  २) पुण्यतिथी
  ३) व्याख्याने इ.

पष्टेपाडा येथील डीजिटल शाळेस ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. जावळे आर. एल. यांनी भेट दिली.

पष्टेपाडा येथील डीजिटल शाळेस ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. जावळे आर. एल. यांनी भेट दिली.

कार्येशाळेस ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. जावळे आर. एल. यांनी भेट दिली.

कार्येशाळेस ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. जावळे आर. एल. यांनी भेट दिली.

सेवांतर्गत विभाग
विभागप्रमुख:श्री. पवार बी.डी.,ज्येष्ठ अधिव्याख्याता
प्रस्तावना - शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच शिक्षणातील नवीन विचारप्रवाह, कल्पना शिक्षकांना माहिती करुन देण्यासाठी संस्थेमधून राज्य, जिल्हा, तालुका, केंद्रस्तरावर सन २०१५-१६ या वर्षात पार पाडलेल्या प्रशिक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे देत आहे. यामध्ये TEAB अंतर्गत प्रशिक्षणे, SSA अंतर्गत प्रशिक्षणे, RMSA अंतर्गत प्रशिक्षणे, विभागस्तरीय प्रशिक्षणे, राज्यस्तरीय प्रशिक्षणे यांचा समावेश आहे. तसेच पालघर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही प्रशासकिय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित झाल्याने विविध खात्यातील कार्मचारी व अधिकार्‍यांची प्रशिक्षणे घेण्याची जबाबदारी संस्थेवर आहे. त्या अनुषंगाने वर्षभरात घेतलेल्या प्रशिक्षणांचा गोषवारा खालीलप्रमाणे देत आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे-पालघर कार्यालय रहाटोली या ठिकाणी शहरी सुविधापासून दूर अल्पभ
ौतिक सुविधायुक्त इमारतीमध्ये स्थित आहे.

चार ज्येष्ठ अधिव्याख्याता व एक अधिव्याख्याता पैकी एस. सी. ई. आर. टी. व इतर सहकार्यालयीन कामकाज पूर्तता करण्याकामी एक ज्येष्ठ अधिव्याख्याता व एक अधिव्याख्याता वगळता उर्वरित ३ ज्येष्ठ अधिव्याख्यातांच्या सहाय्याने ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हयाच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी चालू शैक्षणिक वर्षात खालील प्रशिक्षणे घेण्यात आली.

प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना डॉ. पवार बी. डी., ज्येष्ठ अधिव्याख्याता

प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना डॉ. पवार बी. डी., ज्येष्ठ अधिव्याख्याता

प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना डॉ. पवार बी. डी., ज्येष्ठ अधिव्याख्याता

प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना डॉ. पवार बी. डी., ज्येष्ठ अधिव्याख्याता

अ.क्र. प्रशिक्षणाचे नाव कालावधी जिल्हा उपस्थिती
पासून पर्यंत
इ. ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण २७.०४.२०१५ ०५.०५.२०१५ ठाणे मराठी ७५२१
इ. ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण २७.०४.२०१५ ०५.०५.२०१५ ठाणे इंग्रजी १२८६
इ. ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण २७.०४.२०१५ ०५.०५.२०१५ ठाणे उर्दू ११४६
इ. ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण २७.०४.२०१५ ०५.०५.२०१५ पालघर मराठी ६०९०
इ. ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण २७.०४.२०१५ ०५.०५.२०१५ पालघर इंग्रजी १७५७
इ. ५ वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण २७.०४.२०१५ ०५.०५.२०१५ पालघर उर्दू ११३
निवडश्रेणी - १ ०१.०७.२०१५ ११.०७.२०१५ ठाणे ४७
निवडश्रेणी - १ २०.०७.२०१५ २९.०७.२०१५ ठाणे ४६
प्रगत शैक्षणिक कार्यशाळा ०३.१०.२०१५ ०३.१०.२०१५ ठाणे ५०
निवडश्रेणी - २ १२.१०.२०१५ १७.१०.२०१५ ठाणे ४७
RMSA गणित प्रशिक्षण ठाणे १७.१०.२०१५ १८.१०.२०१५ ठाणे ४५६
RMSA  गणित प्रशिक्षण पालघर १७.१०.२०१५ १८.१०.२०१५ पालघर २३५
निवडश्रेणी - २ २६.१०.२०१५ ३१.१०.२०१५ ठाणे ४६
१० नवोपक्रम कार्यशाळा - ०२.११.२०१५ ठाणे,पालघर ७०
११ SMDC शाळा स्तरावरील व्यवस्थापन व विकास समिती सदस्य प्रशिक्षण १५.१०.२०१५ १७.१०.२०१५ ठाणे ४३
१२ ब्रिटिश कौन्सिल फेज २ इंग्रजी विषय प्रशिक्षण १५.१२.२०१५ १९.१२.२०१५ ठाणे २७८
१३ ब्रिटिश कौन्सिल फेज २ इंग्रजी विषय प्रशिक्षण २८.१२.२०१५ ०१.०१.२०१६ पाालघर १७६
१४ RMSA प्रकल्प आधारित विज्ञान शिक्षण प्रशिक्षण ०१.०२.२०१६ ०२.०२.२०१६ ठाणे २५
१५ RMSA प्रकल्प आधारित विज्ञान शिक्षण प्रशिक्षण ०३.०२.२०१६ ०४.०२.२०१६ पालघर २५
१६ तंत्रस्नेही शिक्षक साधन व्यक्तींचे वेबसाईट निर्मितीचे प्रशिक्षण ०१.०३.२०१६ ०२.०३.२०१६ ठाणे ४९
विविध खात्यातील अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण
१७ सेवा हमी कायदा २३.११.२०१५ ०५.१२.२०१५ पालघर २२०९
१८ ‘ड’ श्रेणी कर्मचारी ०१.०२.२०१६ ०६.०२.२०१६ पालघर ६५
१९ ‘ड’ श्रेणी कर्मचारी १५.०२.२०१६ २०.०२.२०१६ पालघर ३५
20 ‘क’ श्रेणी कर्मचारी ११.०३.२०१६ २२.०३.२०१६ पालघर १६
यशदा मार्फत वर्ग व कर्मचारी यांचे वसइ- किल्ला येथे क्षेत्र भेट

यशदा मार्फत वर्ग व कर्मचारी यांचे वसइ- किल्ला येथे क्षेत्र भेट

विठू हस्तलिखित, वसंतोत्सव वार्षिक अंक प्रकाशित करताना डॉ. भरत पवार

विठू हस्तलिखित, वसंतोत्सव वार्षिक अंक प्रकाशित करताना डॉ. भरत पवार

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मार्गदर्शन करताना डॉ. पवार बी. डी., ज्येष्ठ अधिव्याख्याता

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मार्गदर्शन करताना डॉ. पवार बी. डी., ज्येष्ठ अधिव्याख्याता

जिल्हा स्तरीय व्यवसाय मार्गदर्शन व सल्लागार समिती सभा

जिल्हा स्तरीय व्यवसाय मार्गदर्शन व सल्लागार समिती सभा