नियोजन व प्रशासन विभाग

विभागप्रमुखाचे पद रिक्त यास्तव विभागप्रमुख प्राचार्य
सन २०१४-१५ या सत्रात वर्षभर राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक उपक्रम, कार्यशाळा, प्रशिक्षणे, विविध चाचण्या, संशोधन आणि शैक्षणिक सर्वेक्षण या सर्व उपक्रमांचे नियोजन करुन त्या त्या विभागांना संबंधित विषयांची जबाबदारी निश्चित करुन त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे यांचे मार्फत सनियंत्रण करण्यात आले. त्याचबरोबर सर्व उपक्रम यशस्वितेसाठी लागणार्‍या सर्व सोयी सुविधा व आर्थिक खर्चाचे अंदाजपत्रक या विभागामार्फत तयार करण्यात आले.

AWP & B चे नियोजन व अंमलबजावणी
सन २०१५-१६ या वर्षासाठीचे कार्यक्रम अंदाजपत्रक वर्षाच्या सुरुवातीस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय उपसंचालक यांच्या सहमतीने तयार करण्यात आले. त्यामधील खालील कार्यक्रमांची अंमलबजावणी उपलब्ध तरतूदीच्या अधिन राहून करण्यात आली.

अ.क्र. कार्यक्रमाचे नाव लाभार्थी
विविध प्रकारची प्रशिक्षणे व कार्यशाळा प्राथमिक शिक्षक बी.आर.सी. , सी.आर.सी.
केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक
डी.टी.एड. प्राचार्य व अध्यापक
विविध खात्यातील अधिकारी व    कर्मचारी
शैक्षणिक साहित्य विकसन इ. १ ली ते ७ वी प्राथमिक शिक्षक
नवोपक्रमांना चालना इ. १ ली ते ७ वी प्राथमिक शिक्षक
लघुसंशोधने व कृतिसंशोधने इ. १ ली ते ७ वी प्राथमिक शिक्षक
शैक्षणिक साहित्य कक्ष विकसन इ. १ ली ते ७ वी प्राथमिक शिक्षक
विज्ञान केंद्राचे विकसन जिल्हयातील १ ली ते ७ वी चे विदयार्थी
व्यवसय मार्गदर्शन केंद्र विकसन जिल्हयातील १० वी व १२ वी चे विदयार्थी