विभाग

नियोजन व प्रशासन विभाग
विभागप्रमुखाचे पद रिक्त यास्तव विभागप्रमुख प्राचार्य
सन २०१४-१५ या सत्रात वर्षभर राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक उपक्रम, कार्यशाळा, प्रशिक्षणे, विविध चाचण्या, संशोधन आणि शैक्षणिक सर्वेक्षण या सर्व उपक्रमांचे नियोजन करुन त्या त्या विभागांना संबंधित विषयांची जबाबदारी निश्चित करुन त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे यांचे मार्फत सनियंत्रण करण्यात आले. त्याचबरोबर सर्व उपक्रम यशस्वितेसाठी लागणार्‍या सर्व सोयी सुविधा व आर्थिक खर्चाचे अंदाजपत्रक या विभागामार्फत तयार करण्यात आले.

AWP व B चे नियोजन व अंमलबजावणी
सन २०१५-१६ या वर्षासाठीचे कार्यक्रम अंदाजपत्रक वर्षाच्या सुरुवातीस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय उपसंचालक यांच्या सहमतीने तयार करण्यात आले. त्यामधील खालील कार्यक्रमांची अंमलबजावणी उपलब्ध तरतूदीच्या अधिन राहून करण्यात आली.