शाखांची काये

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेची संरचना :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत खालील चार शाखेमार्फत कार्य चालते. ह्या संस्थेचे प्रमुख प्राचार्य असतात. सध्या डॅा. भक्ती उमर्जी या संस्थेच्या प्राचार्य आहेत.

संस्थेतील या चार शाखांचे प्रमुख ज्येष्ठ अधिव्याख्याता वर्ग -१ चे राजपत्रित अधिकारी असतात. व त्यांना सहाय्यक म्हणून ६ अधिव्याख्याता वर्ग -२ चे राजपत्रित अधिकारी असतात. या सर्वाची निवड महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भर्तीव्दारे केली जाते.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील शाखांची काये:

 • संस्थेतंर्गत कामे :-
  • जिल्हा  शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व विभागात मेळ ठेवणे.
  • संस्थेचे वार्षिक  नियोजन तयार करणे व स्वयंमूल्यमापन अहवाल तयार करणे.
  • संस्थेतील सर्व उद्बोधन प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र पार पाडणे.
  • डी.आर.जी /बी आर सी/सी आर सी समन्वय साधणे.
  • क्षेत्रभेट व शाळा भेटीचे नियोजन  व अंमलबजावणी.
  • सार्वत्रिकीकरण व गुणवत्तावाढ याबाबत प्रशिक्षण वर्ग/ शिबिर/ उपक्रमांचे आयोजन.
 • जिल्हास्तरीय  कामे :-
  • प्राथमिक, माध्यमिक व प्रौढ निरंतर शिक्षणाधिकार्‍यांच्या वेळोवेळी सहविचार सभा घेउुन जिल्हास्तरीय शैक्षणिक  उपक्रमांचे आयोजन करणे व ते पार पाडण्यास मदत करणे.
  • जिल्हयातील शैक्षणिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डी आर जी, बी आर सी, सी आर सी यांना भेटी देवून मार्गदर्शन करणे.
  • जिल्हास्तरीय शैक्षणिक कार्याचे नेतृत्व करणे, मार्गदर्शन देणे, व त्याकामी आवश्यक  तेथे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे.

सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण शाखा :

 • सेवांपूर्व प्रशिक्षण शाखा :
  • जिल्हयाची डी. टी. एड्. अभ्यासक्रम प्रवेश प्र्रक्रिया करून केंद्रिय पध्दतीने जिल्हयातील सर्व अध्यापक  विद्यालयातील छात्राध्यापकाचे प्रवेश होण्यास मदत करणे.
  • संस्थेतील प्र्र्र्र्रथम व व्दितीय वर्षातील डी. टी. एड् छात्राध्यापकांना प्रशिक्षण घेणे.
  • जिल्हयातील डी. टी. एड् विद्यालयात अभ्यासक्रम योग्यरित्या शिकवला जाण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • अध्यापक विद्यालयांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविणे.
  • डी. टी. एड् अभ्यासक्रमाशी निगडीत जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे नियोजन करुन जिल्हयातील अध्यापकाना प्रशिक्षण देणे.
  • जिल्हयातील डी. टी. एड् अभ्यासक्रमाच्या परीक्षा पार पाडण्यास मदत करणे.
 • सेवांतर्गत प्रशिक्षण शाखा :
  • पत्राव्दारा प्रशिक्षणार्थीच्या मार्गदर्शन / संपर्क  सत्राचे आयोजन करणे.
  • सेवांतर्गत शिक्षकांना गरजाभिमुख अल्पमुदत प्रशिक्षण देणे.
  • शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करुन प्रशिक्षण देणे.
  • नवनियुक्त प्रशिक्षित व अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
  • निवडश्रेणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करुन प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देणे.
  • कृतीसंशोधन करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.
  • प्रशिक्षणाची परिणामकारकता पाहण्यासाठी शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचे      सर्वेक्षण/मूल्यमापन करणे.

अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन शाखा :

 • अभ्यासक्रम विकसन :
  • जिल्हयातील शिक्षक व विद्यार्थ्याची गरज समजावून घेउुन त्यानुसार शिक्षक मार्गदर्शिका विकसित करणे.
  • विद्यार्थीपयोगी आशय विकसित करणे.
  • शिक्षकांना अद्ययावत ज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी स्त्रोत निर्माण करणे.
  • शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी लघुसंशोधन व संशोधन करणे.
  • विविध प्रकारच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण घटकसंच तयार करणे.
 • मूल्यमापन विभाग :
  • विविध प्रशिक्षण वर्गाचे घटक  संच (मोडयुल) तयार करणे.
  •  विविध प्रशिक्षण वर्ग/शाळांना भेटी देणे.
  • मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे च्या मार्गदर्शनानुसार परिक्षेशी संबंधित कामाची अंमलबजावणी करणे.
  • सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सवे प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन संदर्भातील सर्व काम पाहणे.
  • विविध प्रशिक्षण वर्गाचे अनुधावन करणे.

शैक्षणिक  तंत्रज्ञान व अनौपचारिक   शिक्षण शाखा:

 • शैक्षणिक  तंत्रज्ञान शिक्षण शाखा:
  • संस्थेतील विज्ञान, मानसशास्त्रीय प्रयोगशाळा, कला व शारीरिक शिक्षण दालने विकसित करणे.
  • शैक्षणिक  तंत्रज्ञान (ीछट) कक्षांचे विकसन करणे.
  • शिक्षक व अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यासाठी तंत्रज्ञान कौशल्ये विकसित करण्यासाठी  (ीछट) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे.
  • टेलिकॉन्फरन्स द्वारे प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करणे.
  • अभ्यासक्रमावर आधारीत आॅडिओ -व्हिडीओ कॅसेटस्ची निर्मिती करणे.
 • अनौपचारिक   शिक्षण शाखा:
  • निरंतर /बाल /अल्पसंख्याक  शिक्षणाबाबत प्रशिक्षण व इतर कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  • अपंग व वंचित घटकांसाठी शैक्षणिक  सुविधांबाबत कार्यवाही करणे.
  • व्यवसाय मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करणे.
  • स्वयंअध्ययन साहित्यांची निर्मिती करणे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्याची ही सर्वसामान्य रुपरेखा आहे. सन २०१४-१५ या वर्षात ठाणे व पालघर दोन्ही जिल्हयासाठी केलेल्या कार्यां चा गोषवारा पुढीलप्रमाणे देत आहे.

 • श्ंडछ राज्यस्तरीय कार्य गटात श्रीम. त्रिभुवन एस. व्ही. यांचे योगदान
 • राज्यस्तरीय व्हिडीओ क्लिप निर्मिती
 • भाषा विषयाकरिता योगदान
 • राज्यस्तरीय अक्ऋ ज्ञ् भ् मध्ये श्री. चौधरी डी.बी., अधिव्याख्याता यांचे योगदान
 • इ. ५ वी अभ्यासक्रम विकसनात श्री. चौधरी डी.बी., अधिव्याख्याता यांचे योगदान
 • श्ंछ व आदिवासी बोलीभाषा राज्यस्तरीय कार्यगटात श्री. चौधरी डी. बी., अधिव्याख्याता यांचे योगदान
 • विभागस्तरीय लघुसंशोधन श्रीम. त्रिभुवन यांनी केले. विदयार्थ्यांच्या गणित विषयाच्या अध्ययनातील अडथळे त्यामुळे दूर होणार आहेत.
 • गोंदिया येथील राज्यस्तरीय सेमिनार ‘शाश्वत गुणवत्तेचे विविध मार्ग’ या विषयावरील चर्चासत्रात डॅा. संजय वाघ यांचा सहभाग.
 • न्यास फाउुंडेशन प्रशिक्षण (ण्छफ् २००५) जिल्हास्तरीय कार्यवाहीत डॅा. संजय वाघ यांचा सहभाग.

 

मीना राजू मंच उद्बोधन वर्गास मार्गदर्शन करताना

मीना राजू मंच उद्बोधन वर्गास मार्गदर्शन करताना

ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीम. त्रिभुवनएस. व्ही.

ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीम. त्रिभुवनएस. व्ही.


परीक्षा परिषदेशी संबंधित

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे मार्फत परीक्षा परिषदेशी संबंधित खालील कामे करण्यात येतात.

 • अध्यापक विद्यालयांची सांकेतांक नुतनीकरणाबाबत तपासणी करणे.
 • अध्यापक विद्यालयांनी संलग्नता शुल्क व विदयार्थी शुल्क भरले याबाबतची पडताळणी करणे.
 • जिल्हास्तरीय मूल्यमापन शिबीरात श्री. वाघ एस. बी., ज्येष्ठ अधिव्याख्याता हयांनी शिबीरप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणे.
 • अध्यापक विद्यालयांनी अंतर्गत गुणदानासाठी तयार केलेल्या अभिलेख्यांची पडताळणी करणे. छात्राध्यापकाच्या उपस्थितीची नोंद घेणे.
 • डी. टी. एड. परीक्षेच्या दृष्टीने अध्यापक विद्यालयांनी भरलेल्या आवेदनपत्रा संदर्भातील प्रपत्र ‘य’ तसेच ‘ह’ वर प्रतिस्वाक्षरी करणे.
 • डी. टी.एड. ५० परीक्षा परिषदेकडून प्राप्त करुन घेउुन अध्यापक विद्यालयांना वितरीत करुन पुन्हा संकलन करुन बाईंडिंग करुन परीक्षा परिषदेला सादर करणे.
 • उत्तीर्ण छात्राध्यापकांचे स्थलांतर प्रमाणपत्र अध्यापक विद्यालयांना वितरीत करणे.
 • छात्राध्यापकांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र अध्यापक विद्यालयांना वितरीत करणे.
 • ७०õ ते ८०õ च्या दरम्यान उपस्थिती असणार्‍या छात्राध्यापकांची अनुपस्थिती क्षमापित करुन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करुन देणे.
 • डी.टी.एड. परीक्षेसाठी केंद्र निश्चिती करणे. केंद्रसंचालक, परिरक्षक नेमणूकी बाबत शिफारस करणे.
 • डी.टी.एड. परीक्षेच्या केंद्रांना भेटी देउुन कॅापी प्रकरणास अटकाव करणे.
 • टी.ई.टी., एन.टी.एस., शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रंाना भेटी देणे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांशी संबंधित
सप्टें / आॅक्टो. तसेच फेब्रु. / मार्च मध्ये होणार्‍या एस.एस.सी., एच.एस.सी. परीक्षा केंद्रांना भरारी पथकाच्या माध्यमातून भेटी देउुन कॅापी प्रकरणास प्रतिबंध करणे.


संस्थेच्या कार्याशी संबंधित सभा, बैठका, शाळाभेटी

 • शैक्षणिक सभा, बैठकांचे स्वरुप
अ. क्र. कोणाशी संबंधित सभा बैठकांचा विषय सभा,बैठकांची संख्या
मा. संचालक म.रा.शै.सं व प्र. प. पूणे ३० दैनंदिन कार्यासाठी मार्गदर्शन, सूचना आढावा १०
मा. संचालक राज्य परीक्षा मंडळ १० वी १२ वी परीक्षा संनियंत्रण
मा. आयुक्त परीक्षा परिषद डी. टी. एड. परीक्षा संनियंत्रण
मा. संचालक यशदा पुणे प्रशिक्षण धोरणावर चर्चा व       मार्गदर्शन
मा. राज्य प्रकल्प अधिकारी  MPSP व युनिसेफ प्रशिक्षण
मा. मुख्य कार्य अधिकारी ठाणे जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास व कार्यनियोजन
मा. मुख्य कार्य अधिकारी पालघर जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास व कार्यनियोजन
शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जि. ठाणे जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास व कार्यनियोजन
१० शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जि. पालघर जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास व कार्यनियोजन
११ गटसाधनव्यक्ती जि. ठाणे दैनंदिन शैक्षणिक कार्याचे नियोजन मार्गदर्शन व आढावा
१२ गटसाधनव्यक्ती जि. पालघर दैनंदिन शैक्षणिक कार्याचे नियोजन मार्गदर्शन व आढावा
१३ शहरी साधनव्यक्ती ठाणे व पालघर दैनंदिन शैक्षणिक कार्याचे नियोजन मार्गदर्शन व आढावा
१४ प्राचार्य अध्यापक विद्यालये अध्यापक विद्यालयाचे संनियंत्रण व शैक्षणिक गुणवत्ता विकास मार्गदर्शन
१५ अध्यापक अध्यापक विद्यालये शैक्षणिक गुणवत्ता विकास
१६ गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख जि. ठाणे व पालघर शैक्षणिक गुणवत्ता विकास
१७ मुख्याध्यापक, जि. ठाणे व पालघर शैक्षणिक गुणवत्ता विकास १७
१८ शिक्षक जि. ठाणे व पालघर शैक्षणिक गुणवत्ता विकास

शाळाभेटीचे स्वरुप

अ.क्र. शाळाभेटीचे स्वरुप भेटींची संख्या
उपक्रमशील शिक्षकांचे उपक्रम पाहण्यासाठी
CCE योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी
शाळेतील विशेष कार्यक्रमानिमित्त
KGBW स्कूल चे शैक्षणिक कार्य पाहण्यासाठी
दत्तक शाळा भेट ३१
अध्यापक विद्यालय भेटी

 


प्रशिक्षण कार्यासाठी भेटी

 • ब्रिटिश कौन्सिल प्रशिक्षण वर्ग
 • पुनर्रचित अभ्यासक्रम इ. ३ री व ४ थी
 • पुनर्रचित अभ्यासक्रम इ. ५ वी (अॅू केंद्र)
 • निवडश्रेणी प्रशिक्षण वर्ग
 • शालेय पोषण आहार प्रशिक्षण वर्ग
 • शाळा समिती सदस्य प्रशिक्षण वर्ग

इतर कामकाजविषयक भेटी

 • संस्थेचे बांधकाम व भौतिक सुविधांसाठी
 • जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग
 • जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व पालघर
 • CSR संदर्भात लोकप्रतिनिधी व शिक्षणप्रेमी व्यक्ती व संस्था

role-meeting

साधनव्यती शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेस मार्गदर्शन ज्येष्ठ अधिव्याख्याता ड्रा. भरत पवार